महिलांना मिळणार सोने आणि रेशमी साडी

महिलांना मिळणार सोने आणि रेशमी साडी
Published on

चेन्नई, ता. ५ (पीटीआय) : तमिळनाडूचे अर्थमंत्री एन. मेरी विल्सन यांनी बुधवारी विधानसभेत तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे काही पक्ष आणि व्यक्तींना निविदांच्या माध्यमातून मिळणाऱ्या बेकायदा पैशांना आळा घातल्याचा दावाही त्यांनी केला. ‘टीव्हीके’ने निवडणुकीवेळी दिलेल्या महत्त्वाच्या आश्वासनांपैकी असलेल्या सुवर्ण साहाय्य योजनांसाठी १,३०० कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद सरकारने या अर्थसंकल्पात केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना विवाहावेळी आठ ग्रॅम सोने आणि एक रेशमी साडी देण्यासाठी तरतूद
तसेच राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावाही टीव्हीकेकडून करण्यात आला आहे.
महिलांसाठीच्या ‘सुवर्ण नाणे आणि रेशमी साडी योजनेसाठी’ सरकारने ८१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयांत जन्मलेल्या नवजात बालकांसाठी सुवर्ण अंगठी योजनेसाठी ५६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेची निवडणूक आश्वासनांपैकी एक होती. तसेच ‘वेत्री मडिकणिनी तिट्टम’ योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी ‘पल्ली निरैवू तिट्टम’ ही योजना जाहीर करत चालू आर्थिक वर्षासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते के. कामराज यांच्या नावाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक निवासी शासकीय शाळा उभारण्याच्या योजनेसाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणाही विल्सन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. टीव्हीके सरकारने ७१७ मद्यविक्री दुकाने बंद केल्याची घोषणाही करण्यात आली.


ठळक तरतूदी
- ‘वेत्री मडिकणिनी तिट्टम’अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप
- हज यात्रेकरूंना दिले जाणारे अनुदान २५ हजार रुपयांवरून ३५ हजार रुपये करणार
- अमलीपदार्थमुक्त तमिळनाडूसाठी सात कोटी रुपयांची तरतूद
- घरगुती ग्राहकांना २०० युनिट मोफत वीज देण्याची योजना सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com