पुण्यात बुधवारपासून "तनिष्का जल्लोष' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

पुणे - "तनिष्का व्यासपीठा'च्या मुंबई येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनाने उल्हासित व प्रोत्साहित झालेल्या सदस्यांनी आता "तनिष्का जल्लोष' या दोनदिवसीय उपक्रमाचे आयोजन केले आहे. म्हात्रे पुलाजवळील डी. पी. रोडवरील कृष्णसुंदर गार्डन येथे बुधवार (ता. 24) व गुरुवारी (ता. 25) हा जल्लोष होणार आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला या उपक्रमाचे उद्‌घाटन बुधवारी सकाळी 11 वाजता करणार आहेत. 

महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, स्वयंरोजगाराचा मंत्र त्याचबरोबर सुरक्षिततेचाही कानमंत्र मिळावा, या हेतूने या माहिती-मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

महिलांसाठी पाककृतीसह विविध स्पर्धा, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, सौंदर्याच्या टिप्स, मुलांसाठी किड्‌स कॉर्नर, खास स्त्रीजीवनावर आधारित "ती'ची गाणी असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तनिष्का सभासदांबरोबरच अन्य महिलांनाही सहभाग घेता येणार आहे. अमित गायकवाड ग्रुप हे या कार्यक्रमाचे स्थळ प्रायोजक; तर मे. श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स हे मुख्य प्रायोजक आहेत. 

या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनानंतर सायबर क्राईम, व्यक्तिमत्त्व विकास, सौंदर्याच्या टिप्स, एक मिनीट स्पर्धा, पाककृती असा माहिती आणि मनोरंजनाचा खजिनाच महिलांसाठी खुला होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या जल्लोषात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक तनिष्कांनी केले  आहे. या वेळी वास्तुतज्ज्ञ रमेश पलंगे आणि सुषमा पलंगे यांच्या वास्तुशास्त्रावरील पुस्तिका मोफत वितरित केल्या जाणार आहेत. 

सहभागासाठी आजपर्यंत संधी 
"तनिष्का जल्लोष'मधील सक्रिय सहभागासाठी सोमवारी (ता. 22) दुपारी तीन वाजेपर्यंत 9922444912 या क्रमांकावर एसएमएसद्वारे संपर्क साधावा. तनिष्का सदस्य नसलेल्या महिलांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील. 

Web Title: Tanisha jallosh from Wednesday in Pune