‘तनिष्का’मुळे नेतृत्व गुणांचा विकास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

पुणे - ‘तनिष्का’ ने महिलांना व्यक्त करण्याची संधी मिळवून दिली आहे. त्याद्वारे त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित होतील. त्या अभिमानाने समाजातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी सक्रिय होऊ शकतील. त्यामुळे आम्ही ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या तनिष्का निवडणुकीतील महिलांस सहकार्य देणार आहोत, असा दृढ निश्‍चय पद्मशाली पंचकमिटी महिला मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला. 

महिलांमधील नेतृत्वगुण विकसित करणारी ही निवडणूक असून, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सकाळ’च्या कार्यालयात आयोजित बैठकीत पद्मशाली समाजाच्या महिला मंडळाच्या सदस्या शुक्रवारी उपस्थित होत्या. एक महिला शिकली, तर संपूर्ण कुटुंब शिकते. त्याप्रमाणे एखादी महिला स्वयंस्फूर्तीने समाजकार्यात सक्रिय झाली तर ती इतिहास घडवू शकते. असा ठाम विश्‍वास व्यक्त करीत या महिलांनी निवडणुकीतील उमेदवारांना पाठिंबा दर्शविण्याचा मानसही या वेळी व्यक्त केला.  

महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी अंदे म्हणाल्या,‘‘पद्मशाली समाजाच्या महिला फारशा शिकत नसत. विडी आणि टेलरिंग व्यवसायातच त्या होत्या. मात्र, आत्ताची पिढी शिक्षण घेत आहे. त्यामुळे या समाजातील महिला, मुली शिक्षित आहेत. चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. ‘सकाळ’च्या उपक्रमातून महिलांना व्यासपीठ उपलब्ध झाले असून, आम्ही या महिलांच्या पाठीशी उभे राहू.’’  

सचिव रेखा आडप म्हणाल्या,‘‘आमच्या समाजातील महिलाही आता सक्रिय होऊ लागल्या आहेत. महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हे एक चांगले व्यासपीठ आहे. त्यामुळे आम्ही महिलांना सहकार्य करू.’’ चंद्रकला पुट्टा, रंजना तन्वीर, वंदना बोज्जा, लक्ष्मी कोंडा, वैशाली कोटा, पद्मावती मार्गम, राजश्री बंडी, सुरेखा चिल्वेरी, त्रिवेणी अडप यांसह समाजाच्या अन्य महिलाही बैठकीत सहभागी झाल्या होत्या. 

Web Title: tanishka election in pune

टॅग्स