द्रुतगतीवर टॅंकरची केबिन भस्मसात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ रसायनाची वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या केबिनला रविवारी (ता. 6) सकाळी आग लागून ते भस्मसात झाले. आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. 

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरघाट चढून आल्यावर लोणावळ्याजवळील गोल्डव्हॅली नजीक मुंबईहून पुण्याच्या दिशेने कास्टिंग रसायन घेऊन निघालेल्या टॅंकरच्या (जी. जे. 05 बी. यू. 5995) केबिनमध्ये सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून टॅंकर बाजूला घेतला. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी कंपनी, देवदूत यंत्रणा, खोपोली, लोणावळा नगरपरिषदेचा अग्निशामन विभाग, खंडाळा महामार्ग पोलिस घटनास्थळी धावून गेले. त्यांनी केबिनला लागलेली आग विझविली. दरम्यान, या दुर्घटनेत केबिन पूर्णपणे भस्मसात झाली आहे. 

Web Title: tanker cabin fire on expressway