कोरोना रुग्णांसाठी तंटामुक्तीचा अध्यक्ष बनला अॅम्बुलन्स ड्रायव्हर!

Swapnil_Kokane
Swapnil_Kokane

घोडेगाव (पुणे) : चिंचोली कोकण्यांची (ता. आंबेगाव) गावातील वयोवृध्द दांपत्य कोरोना संक्रमित झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध होती, परंतु त्यावर चालक नव्हता. अखेर गावातील युवक आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष स्वप्निल कोकणे यांनी लगेच अंगावर पीपीई किट घालून चालक बनले. गावातील दोन आणि इतर तीन अशा पाच रुग्णांना त्यांनी पुढील उपचारासाठी रुग्णालयात सोडले. तसेच भविष्यात रुग्णालयाला गरज पडली, तर रुग्णवाहिका चालविण्यासाठी मदत करू, असे आश्वासनदेखील त्यांनी यावेळी दिले. 

दरम्यान, गावातील कोरोनाचे रुग्ण नेण्यासाठी कोणी तयार होत नव्हते. मात्र, अशावेळी स्वप्निल कोकणे यांनी चालक बनत सर्व पाच रुग्णांना सुरक्षितपणे कोविड केअर सेंटरमध्ये नेऊन सोडले. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतापराव चिंचोलीकर, व्हाईस चेअरमन अक्षय काळे, कांदा-बटाटा व्यापारी पांडुरंग रोकडे, पोलीस पाटील राजू झोडगे, सावता झोडगे यांनी त्याचे विशेष आभार मानले.

घोडेगावमधील कोविडच्या रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी राम काळे मित्र मंडळ आणि राम ग्रामीण पतसंस्थेने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. परंतु या रुग्णवाहिकेवरील चालक आजारी पडल्याने रुग्णवाहिका जागीच उभी होती. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात चिंचोलीमधील दोन रुग्ण आणि इतर तीन रुग्णांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी येथील कोविड केअर सेंटरवर न्यायचे होते. मात्र, चालक मिळत नव्हता. पण वेळेचं भान राखत कोकणे यांनी त्या सर्वांना कोविड केअर सेंटरवर पोहोचवले. यामुळे पंचक्रोशीत कोकणे यांचीच चर्चा सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com