'सकाळ'च्या बातमीमुळे मिळाली तन्वीच्या शस्त्रक्रीयेसाठी मदत

सुदाम बिडकर
शनिवार, 7 जुलै 2018

पारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील मेंदुच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या अन्वी गुरुनाथ फल्ले या चार वर्षाच्या चिमुकलीच्या मेंदुवरील शस्त्रक्रियेसाठी पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे परंतु रुग्णवाहीकेवर चालक म्हणुन काम करणार्या अन्वीच्या वडीलांची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने पैशाअभावी शस्त्रक्रीया लांबत चालली आहे.

पारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील मेंदुच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या अन्वी गुरुनाथ फल्ले या चार वर्षाच्या चिमुकलीच्या मेंदुवरील शस्त्रक्रियेसाठी पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे परंतु रुग्णवाहीकेवर चालक म्हणुन काम करणार्या अन्वीच्या वडीलांची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने पैशाअभावी शस्त्रक्रीया लांबत चालली आहे. उपचारासाठी मदतीच्या आवाहनाची बातमी दैनिक सकाळ मध्ये प्रसिध्द होताच अनेकांचे वैयक्तीक, सामुहीक व संस्थांतर्फे मदतीचे हात पुढे आले आणि बघता बघता अडीच लाख रुपये जमा झाले मुखमंत्री सहाय्यता नीधीतुनही एक लाख रुपये मिळाले आणि तन्वीच्या मेंदुवरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली जणु तन्वीचा पुर्नजन्मच झाला असुन ती आता मैत्रिणीबरोबर खेळु बागडु लागली आहे. 

येथील सर्वसामान्य फल्ले कुटुंबातील गुरुनाथ फल्ले यांच्या चार वर्षाची अन्वी अचानक आजारी पडल्याने वैद्यकीय तपासण्यानंतर तीच्या मेंदुला दोन गाठी असल्याचे निदान झाले आणि फल्ले कुटुंबाची पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली पुणे येथील केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी मेंदुवर तातडीने शस्त्रक्रीया करावी लागेल असे सांगीतले गुरुनाथ फल्ले यांनी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडुन उसनवारी करुन पैसै जमा केले काही पैसे व्याजाने घेतले. ऑगष्ट 2017 मध्ये पहीली शस्त्रक्रीया करुन मेंदुवरील एक गाठ काढण्यात आली या शस्त्रक्रियेला एकुण सात लाख रुपये खर्च आला होता आता दुसरी गाठ काढण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे त्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे परंतु पैशाअभावी शस्त्रक्रीया लांबत चालली होती.

अन्वीच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असुन मदतीच्या आवाहानाची बातमी दैनिक सकाळ मध्ये प्रसिध्द होताच मदतीसाठी अनेकांचे हात पुढे आले. जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष अॅड. विष्णु हिंगे यांनी 51 हजार रुपयांची मदत दिली, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेने 25 हजार रुपये, खेड तालुक्यातील ग्रामस्थांकडुन 18 हजार रुपये, विद्या विकास मंदिर विद्यालयातील माजी विद्यार्थांकडुन 30 हजार रुपये, अवसरी बुद्रुक प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडुन 11 हजार 500 रुपये, ग्रामस्थांकडुन 46 हजार रुपये तसेच बॅक खात्यावर अनेकांनी 70 हजार रुपये जमा केले असे एकुण अडीच लाख रुपये व मुखमंत्री सहाय्यता नीधीतुनही एक लाख रुपये मिळाले या मदतीमुळे अन्वीच्या मेंदुवर डॉक्टरांनी आठ तास यशस्वीरीत्या शस्त्रक्रीया करुन गाठ काढली असुन अन्वी आता ठणठणीत बरी झाली आहे ती आता मैत्रिणीबरोबर खेळु बागडु लागली आहे. केवळ एका बातमीने लाखो रुपयांची मदत जमा झाल्याने अन्वीला पुर्नजन्म मिळाला आहे त्याबद्दल फल्ले कुटुंबाने दैनिक सकाळला धन्यवाद दिले आहे.

Web Title: tanvi get help after news publish in sakal