पुण्याच्या सुवर्णकन्येला नेदरलॅंडच्या डेल्फ विद्यापीठाची स्कॉलरशिप!

Tanvi_Patil
Tanvi_Patil

पुणे : पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची (सीओईपी) सुवर्ण पदक विजेती तन्वी पाटील या विद्यार्थिनीला पदव्युत्तर शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. नेदरलॅंडच्या टी.यू.डेल्फ विद्यापीठात अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी तिची 'जस्टिस ऍन्ड लुई व्हॅन ऐफेन एक्‍सलन्स' शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. 

संगीताचे उपासक हर्षित अभिराज (अभय पाटील) आणि गृहिणी असलेल्या सुचेता यांच्या या सुवर्णकन्येने प्रॉडक्‍शन ऍन्ड इंडस्ट्रिअल मॅनेजमेंटमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने डेल्फ विद्यापीठात ऑनलाईन अर्ज केला होता. त्यावेळी संबंधीत शिष्यवृत्ती संदर्भातील माहिती तिने भरली होती. सोबत प्राध्यापकांचे शिफारसपत्रही जोडले होते. त्यानंतर संबंधित फाउंडेशनच्या वतीने तिला निवड झाल्याचे ई-मेलने कळविण्यात आले होते. सुमारे पन्नास लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीमध्ये दोन वर्षांच्या शैक्षणिक खर्च आणि राहण्याची व्यवस्था होणार आहे. 

'स्कील अपग्रेडेशन' आवश्‍यक 
तन्वीने ऑटोमोबाईल क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांमध्ये इंटर्नशिप केली होती. हे करत असताना तिला अधिक कौशल्य विकासाची आवश्‍यकता भासली. त्या दृष्टीने तिने पदव्युत्तर शिक्षणाचा विचार केला. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाखेतील ज्ञानाबरोबच मार्केटची गरज ओळखून ऑनलाइन मार्केटिंग, ऍनॅलिटीक्‍स, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान व्यवस्थापन आदींशी निगडित अधिकचे ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने बदलत्या काळानुसार 'स्किल अपग्रेडेशन' आवश्‍यक असल्याचे तन्वी म्हणाली. 

माझे पदव्युत्तर शिक्षण तंत्रज्ञान व्यवस्थापनासंबंधीचे असेल. अभियांत्रिकी क्षेत्रात नव तंत्रज्ञानातील बदलांची शाश्‍वतता निश्‍चित करण्याचे माझे काम असेल. या शिष्यवृत्तीमुळे मला हे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मोठी मदत झाली आहे. 
- तन्वी पाटील 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com