तापकीर आत्महत्याप्रकरणी चौघांना कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पुणे - चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या पत्नीसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

पुणे - चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या पत्नीसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

अतुल बाजीराव तापकीर यांनी रविवारी आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांचे वडील बाजीराव तापकीर यांनी डेक्कन पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी प्रियांका अतुल तापकीर (वय 32, रा. गणेशनगर, पिंपळेनिलख), बापू किसन थिगळे (वय 37, रा. राजगुरुनगर), कल्याण रामदास गव्हाणे (वय 45, रा. कुशल निवृत्ती सोसायटी, कोंढवा खुर्द), प्रसाद ऊर्फ बाळू रामदास गव्हाणे (वय 48, रा. मारुती आळी, कोंढवा खुर्द) यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध संगनमत करून अतुल तापकीर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. बापू थिगळे याच्याविरुद्ध खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले गेल्याची माहिती तपासात पुढे आल्याचे सहायक सरकारी वकील सुहास धुमाळ यांनी न्यायालयास सांगितले. 

आरोपी प्रियांका हिचे कल्याण आणि बाळू हे मानलेले भाऊ आहेत, तर थिगळे हा मावसभाऊ आहे. आरोपी अतुल यांचा सातत्याने मानसिक छळ करीत होते. अतुल यांनी एक मराठी चित्रपट तयार केला होता, त्यात ते कर्जबाजारी झाले होते. त्यानंतर त्यांचा पत्नीकडून जास्त मानसिक त्रास होऊ लागला होता. त्यास कंटाळून अतुल यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याविषयी अतुल यांनी सासरकडील लोकांना माहिती दिली होती. त्यानंतर बाळू आणि कल्याण यांनी गोड बोलून अतुल यांना पिंपळेनिलख येथील स्मशानभूमीत नेऊन मारहाण, दमदाटी केली होती. प्रियांकाला दरमहा 10 हजार रुपये देण्यासाठी थिगळे याने अतुल यांना धमकाविले होते.

Web Title: Tapkir suicide case