हातपंपाच्या पाण्याला ‘तरलटेक’ची शुद्धता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातपंपाच्या पाण्याला ‘तरलटेक’ची शुद्धता

पाणी शुद्ध करण्यासाठीच्या तांत्रिक बाबींवर पूर्वीपासूनच काम सुरू आहे. मात्र, रिॲक्‍टरसारखे उत्पादन पहिल्यांदाच तयार केले आहे. हे पूर्णता भारतीय बनावटीचे आहे.

हातपंपाच्या पाण्याला ‘तरलटेक’ची शुद्धता

पुणे - हातपंपाचे पाणी स्वच्छ दिसत असले, तरी त्याच्यात आरोग्याला अपायकारक असे अनेक घटक असतात. पण, तरीही नाइलाजास्तव लोकांना तेच पाणी प्यावे लागते. आता केवळ तळहाताएवढे असलेले  ‘तरलटेक रिॲक्‍टर’ हे यंत्र तुम्हाला हातपंपातून शुद्ध आणि निर्जंतुक पाणी देणार आहे. 

परवडणाऱ्या किमतीत, विनावीज आणि अनेक वर्षे चालणारे हे यंत्र आयआयएम बंगळुरूमधून एमबीए केलेले अंजन मुखर्जी यांनी विकसित केले आहे. त्यांच्या या स्टार्टअपचा बाजारात सध्या बोलबाला सुरू आहे. 

सुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट, चॅटिंग सुरू, व्हिडिओ कॉल आणि तरुण अलगद ‘हनी ट्रॅप’मध्ये फसतो

बोअरवेलवर असलेल्या हातपंपातून येणारे पाणी शुद्धतेच्या मापात बसतेच असे नाही. सांडपाणी, मानवी मलमुत्राचे मिश्रण आणि शरीरास अपायकारक असलेले अनेक घटक त्या पाण्यात मिसळतात. त्यामुळे असे पाणी प्यायल्यास  जुलाब, कॉलरा, टायफॉईड असे आजार होतात. त्यातून दरवर्षी हजारो बालकांचा मृत्यू होतो. रिॲक्‍टरमुळे या सर्व आजारांना आळा बसत आहे. रिॲक्‍टर असलेल्या बोअरवेलमधून आलेले पाणी पिऊन १० लाखांहून अधिक नागरिकांचे आरोग्य सुदृढ झाले आहे, असा दावा मुखर्जी यांनी केला आहे. 

IAS अधिकाऱ्यानं सुचवला रामबाण उपाय, 'शेतकऱ्यांचं आंदोलन थांबवायचंय तर...'

पाणी शुद्ध करण्यासाठीच्या तांत्रिक बाबींवर पूर्वीपासूनच काम सुरू आहे. मात्र, रिॲक्‍टरसारखे उत्पादन पहिल्यांदाच तयार केले आहे. हे पूर्णता भारतीय बनावटीचे आहे. देशात एक कोटीहून अधिक हातपंप असून, त्यातून मिळणारे जंतूविरहित पाणी शुद्ध करण्याचे आमचे ध्येय आहे. 
- अंजन मुखर्जी, संस्थापक, तरलटेक 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशुद्ध पाण्याचे परिणाम 
    ६६ कोटींपेक्षा जास्त नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित 
    २०५० पर्यंत जगातील ४५ टक्के नागरिकांना शुद्ध पाणी न मिळण्याचा धोका 
    देशात १ कोटी ३० लाख हातपंप 
    पाण्यामुळे होणाऱ्या आजारातून दरवर्षी मृत्यू होणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात

असे काम करते रिॲक्‍टर
तळहाताच्या आकाराचे हे रिॲक्‍टर हातपंपाच्या वरील भागात तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीविना बसवता येते. त्याचे काम सुरू राहण्यासाठी वीज, रसायने, फिल्टर अशा कोणत्याही बाबींची गरज लागत नाही. त्याची वेळोवेळी देखभाल-दुरुस्तीही करावी लागत नाही. हातपंपातून येणारे पाणी या रिॲक्‍टरमधून शुद्ध होऊन येते.