अंजनगाव येथे तहसीलदार पाटील यांचे गावकऱ्यांसमवेत श्रमदान

विजय मोरे
सोमवार, 30 एप्रिल 2018

गावचा दुष्काळ कायमचा मिटावा व गाव पाणीदार व्हावे, यासाठी अंजनगावकरानी यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत भाग घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत 8 एप्रिलपासून दररोज सकाळी आठ वाजता गावकरी एकत्रित येवून सोनवडी - अंजनगाव शिवेलगतच्या गावाच्या पाणलोट असलेल्या माथ्यावर श्रमदान करत आहेत.

उंडवडी : अंजनगाव (बारामती) येथे पानी फाउंडेशन उपक्रमाअंतर्गत बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील यांनी गावकऱ्यांसमवेत मोठ्या उत्साहात आज सकाळी श्रमदान केले. यावेळी गावच्या पाणलोटावर श्रमदानातून पन्नास मीटरच्या दोन (सी. सी. टी) सलग समतल चर खोदण्यात आल्या. 

यावेळी पानी फाउंडेशन टिमच्या वरिष्ठ सामाजिक प्रशिक्षिका ज्योती सुर्वे, तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड, गावच्या सरपंच आशा परकाळे, माजी सरपंच दिलीप परकाळे, उद्योजक सुरेश परकाळे, दादासाहेब मोरे, मिलिंद मोरे, संजय परकाळे,  जालिंदर वायसे, ग्रामसेविका पी. पी. देवकाते तसेच पानी फाउंडेशन टिमचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात श्रमदान केले.  

गावचा दुष्काळ कायमचा मिटावा व गाव पाणीदार व्हावे, यासाठी अंजनगावकरानी यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत भाग घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत 8 एप्रिलपासून दररोज सकाळी आठ वाजता गावकरी एकत्रित येवून सोनवडी - अंजनगाव शिवेलगतच्या गावाच्या पाणलोट असलेल्या माथ्यावर श्रमदान करत आहेत.

गावकऱ्यांच्या श्रमदानाची दखल घेवून बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील यांनी आज सकाळी श्रमदानासाठी हजेरी लावली. यावेळी तहसीलदार पाटील यांनी हातात टिकाऊ घेवून मोठ्या उत्साहात सलग समतल चर (सी. सी.टी) खोदली व व लोकांना श्रमदानासाठी प्रोत्साहीत केले. 

यावेळी तहसिलदार पाटील व गावकऱ्यांनी दीड तास श्रमदान करुन पन्नास मीटर लांबीच्या दोन (सी.सी.टी)सलग समतल चर खोदून पूर्ण केल्या. श्रमदानानंतर याचठिकाणी एका झाडाखाली सरपंच आशा परकाळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. 

Web Title: tashildar hanumant patil work in village