पुणे महापालिकेच्या 'कोव्हिड कंट्रोल रूम' अन् कोविड सेंटर्समध्ये गिर्यारोहकांची टास्क फोर्स

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या (एएमजीएम) 'टास्क फोर्स'चे गिरीरोहक महापालिकेसाठी कोविड सेवक म्हणून कार्यरत झाले आहेत. यामध्ये कोविड सेंटर्समधील विविध कामे गिर्यारोहकांकडून केले जात आहे.

पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या (एएमजीएम) 'टास्क फोर्स'चे गिरीरोहक महापालिकेसाठी कोविड सेवक म्हणून कार्यरत झाले आहेत. यामध्ये कोविड सेंटर्समधील विविध कामे गिर्यारोहकांकडून केले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनावर सुद्धा ताण वाढत आहे. यासाठी मनुष्यबळाची मागणी वाढली असून त्यासाठी गिर्यारोहक विविध गटांमध्ये महापालिकेच्या 'कोविड कंट्रोल रूम' आणि कोविड सेंटर्समध्ये 'डेटा एन्ट्री'चे काम करत आहेत. याकरिता 70 गिर्यारोहक स्वयंसेवक पालिकेच्या प्रशासनाला मदत करण्यासाठी नेमण्यात आले आहेत. तर हे काम दिवसभरात सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत चार शिफ्टमध्ये सुरू आहे.

कोरोना उपायोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरू

शहरातील विविध भागांमध्ये कोविड आणि स्वॅब सेंटर्स तयार करण्यात आले असून कार्यकर्ते येथील पाहणी करत आहेत. यामध्ये बिबवेवाडी, सिंहगड महाविद्यालय, कोथरूड आणि केळेवाडी येथे कार्य सुरू असल्याची माहिती एएमजीएमचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी दिली.

कोरोनात सगळंच वाईट घडतं असं नाही; लग्नाचा हा मजेशीर किस्सा वाचाच !

कामासाठी अजित ताटे, सुयश मोकाशी, सचिन गायकवाड, अपर्णा प्रभुदेसाई, विकास भोंडवे, आनंद दरेकर, चैतन्य जोशी, अमृत धनगर व केतकी करंदीकर यांचाही सहभाग आहे. प्रशासनाला मदत करण्याचे कार्य गेल्या 16 दिवसांपासून सुरू आहे व हे काम परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सुरू राहणार आहे. गिर्यारोहक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खंबीर असल्याने आज ते या सेवेसाठी पुढाकार घेत आहेत. तर या संकटाच्या काळात प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करू असे झिरपे यांनी नमूद केले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Task Force of Climbers in Covid Control Room and Covid Centers of Pune Municipal Corporation