आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी टास्क फोर्स - रमेश पोखरियाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

देशातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अभ्यासक्रमांतील माहिती, शिकविण्याची पद्धत, मूल्यमापन यांचा दर्जा वाढविणे गरजेचे आहे; तसेच कॅम्पसमधील सोयीसुविधांचा दर्जा, वसतिगृहे, खानावळ यांच्यातही सुधारणा करण्यास वाव आहे. आपण ज्यात ‘प्रवीण’ आहे असे वेद, उपनिषदे, आयुर्वेद यांसह अवकाश विज्ञान, समुद्र विज्ञान या अभ्यासक्रमांची सुरुवात करणे आवश्‍यक आहे. सल्याचे मत विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. 
- विनय सहस्रबुद्धे,  अध्यक्ष, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद

पुणे - देशात शिक्षणासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वसतिगृह, खानावळ, व्हिसा व इतर शैक्षणिक समस्यांच्या निराकरणासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, आयसीसीआर, मनुष्यबळ विकास मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय यांचा एकत्रित टास्क फोर्स गठित करण्यात येणार आहे, अशी माहिती मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) वतीने दोनदिवसीय डेस्टिनेशन इंडिया परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्‌घाटन समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, अनिल सहस्रबुद्धे, अखिलेश मिश्रा उपस्थित होते. जगभरातील विद्यार्थ्यांना भारतातील शिक्षणसंस्थांकडे आकर्षित करण्यासाठी आवश्‍यक नीतीची चर्चा परिषदेत होणार आहे.  

शिवाजी रस्ता बंद केल्याने प्रवाशांचे हाल; पीएमपीलाही 35 लाखांचा फटका

डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय, व्यापारी संबंधासाठी वेगवेगळ्या परिषदा कार्यरत आहेत; परंतु सांस्कृतिक आणि ज्ञानाच्या आदान-प्रदानासाठी कोणतीच परिषद अथवा संघटना कार्यरत नाही. भारताकडे असलेला संस्कृती आणि ज्ञानाचा ठेवा जगातील देशांसाठी मार्गदर्शक आहे. आयआयटीच्या धरतीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरल हार्मोनीची स्थापना करणे आवश्‍यक आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Task force for international student