शिवाजीनगर : पदपथावर करदात्यांच्या पैशाची उधळण

धोरण ठेवून काम न केल्याने नागरिक संतप्त
Shivajinagar
Shivajinagar sakal
Summary
  • रस्ता रुंद होणार असताना देखी नवीन पदपथ बांधून तो पुन्हा काढण्यासाठी लाखो रुपये खर्चाची उधळण

  • विद्यापीठ चौक ते पाषाण रस्ता या ठिकाणी पदपथ बनवण्यासाठी दोन कोटी खर्च

  • नागरिकांच्या कररुपी पैशाची उधळण, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

शिवाजीनगर : सहा महिन्यापूर्वी महापालिकेच्या पदपथ विभागाकडून विद्यापीठ चौकात, मॉडर्न शाळेकडे जाणारा नवीन पदपथ तयार करण्यात आला होता.सध्या विद्यापीठ चौकात मेट्रोचे काम सुरू आहे.नवीन आराखड्यानुसार विद्यापीठ चौकातील रस्ता रुंद करण्यासाठी हा पदपथ काढला जातोय.यासाठी जवळपास दोन लाख रुपये खर्च येणार आहे.रस्त्यांची रुंदी वाढणार , हे सर्वांना माहीत होते तरी देखील पदपथ बांधण्यासाठी महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च केले गेले.नागरिकांनी भरलेल्या कररुपी पैशाची उधळण महापालिकेच्या वतीने कशा पद्धतीने केली जाते? याचे उत्तम उदाहरण देता येण्यासारखे आहे.सहा महिन्यांपूर्वी ज्या ठेकेदाराने पदपथ बनवला त्याच ठेकेदाराने पुन्हा तो पदपथ काढला आहे.

Shivajinagar
केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले

"नागरिकांच्या पैशाची उधळण करण्यासाठीच नवीन पदपथ बनवला जातोय.मागील चार पाच महिन्यापूर्वी सदरील पदपथ बांधून पूर्ण केला होता.तो पुन्हा काढायला लागले आहेत.नागरिक शांत बसतात त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून असं केलं जातं.लोकप्रतिनिधी कधी इकडे फिरकत पण नाहीत."

- अध्यक्ष चतुर्श्रुंगी नागरीक कृती समिती संजय जाधव

"सदरील पदपथ नुकताच बनवला होता.बनवण्यापूर्वी सगळ्यांना माहीत होतं रस्ता रुंद करताना तोडावा लागणार आहे, तरी देखील लाखो रुपये खर्च करून पदपथ बनवण्यात आला.नगरसेवकांनी चार वर्षापासून पदपथ बनवला असता तर त्याचा पूर्वी वापर तर झाला असता,आता मात्र करदात्यांच्या पैशाची उधळण केली आहे."

- रहिवासी विद्यापीठ चौक निखील भोपळे

Shivajinagar
कात्रज चौकात ड्रेनेजचे पाणी ओढ्यात

"या भागातील लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना विकासाचं कोणतही धोरण नाही.पदपथ बांधला नसता तर वाहनांची एक रांग वाढली असती.रस्ता वाढणार आहे म्हटल्यावर पदपथ बांधायचा नव्हता.शाळा बंद असताना पदपथ बांधून नागरिकांच्या पैशाची उधळण केली."

- व्यावसायिक विद्यापीठ चौक निखील अनगळ

"रस्ता रुंदीकरणासाठी जागा मिळणार आहे त्यामुळे तो पदपथ काढून घेतला जातोय.पी.एम.आर.डी.ए, वाहतूक पोलिस, महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.जे.सी.बी,वाहणे जावून खराब होयला नको म्हणून व्यवस्थित काढून घेतला जातोय.यासाठी जवळपास दोन लाख रुपये खर्च येईल."

- कार्यकारी अभियंता महापालिका दिनकर गोजारे

"साधारण मागील जून महिन्यात पदपथ बांधला होता.सध्या ७५ मिटर लांब व तीन मिटर रूदीचा पदपथ काढला जातोय.नवीन बनवताना दीड मिटर रुंदीचा बनवला जाणार आहे.पी.एम.आर.डी. ए ने सांगितल्याप्रमाणे पदपथ काढला जातोय.बाणेर मार्गे जाणारी वाहतूक पाषाण कडून तात्पुरती मेट्रोचे काम होईपर्यंत वळवली जाणार आहे.त्यामुळे पदपथ काढला जातोय."

- ठेकेदार संदीप देसाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com