
TCS Pune Employee: दिग्गज आयटी कंपनी टीसीएसने थकवलेला पगार द्यावा या मागणीसाठी पुण्यातील ऑफिसबाहेर एका कर्मचाऱ्यानं आंदोलन केलं. सौरभ मोरे असं कर्मचाऱ्याचं नाव असून त्याचा फूटपाथवर झोपलेला फोटो व्हायरल झाला आहे. त्यात सौरभ मोरे हा तरुण त्याची बॅग उशाला घेऊन फुटपाथवर झोपल्याचं दिसतंय. त्याच्या बाजूला एक पत्रही ठेवण्यात आलं असून आता याबाबत कंपनीने प्रतिक्रिया दिलीय.