वेल्हाळ, मोढवे यांना ‘टीचर इनोव्हेशन अॅवॉर्ड’

कृष्णकांत कोबल
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

मांजरी खुर्द : प्राथमिक शाळा नांदूर (ता. दौंड) येथील माधुरी वेल्हाळ तर महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील अरविंद मोढवे यांची जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक म्हणून ‘टीचर इनोव्हेशन अॅवार्ड 2018’साठी निवड झाली आहे. रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था (IIM) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन सोलापूर यांच्या वतीने हा गौरव केला जात आहे.

मांजरी खुर्द : प्राथमिक शाळा नांदूर (ता. दौंड) येथील माधुरी वेल्हाळ तर महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील अरविंद मोढवे यांची जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक म्हणून ‘टीचर इनोव्हेशन अॅवार्ड 2018’साठी निवड झाली आहे. रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था (IIM) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन सोलापूर यांच्या वतीने हा गौरव केला जात आहे.

राज्यातील 53 जणांना हे अॅवॉर्ड जाहीर झाले असून पुणे जिल्ह्यातील वेल्हाळ व मोढवे यांचा त्यामध्ये सहभाग आहे. या  अॅवॉर्डमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत हे अॅवॉर्ड जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर ही निवड केली जाते. येत्या 6 व 7 ऑक्टोबरला कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्नीक कॉलेज, अक्कलकोट, जि. सोलापूर येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

उपक्रमशील शिक्षक मोढवे हे महाळुंगे पडवळ येथील जिल्हापरिषद शाळेत कार्यरत असून त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानातून शिक्षण मिळावे यासाठी सहकाऱ्यांच्या मदतीने 'अनुभूतीतून आत्मनिर्भता' हा नवोपक्रम राबविला. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. त्यात लेखक आपल्या भेटीला, विज्ञानातील गमतीजमती, काव्यांजली, व्यावसायिकांच्या मुलाखती, क्षेत्रभेटी, विविध लेखक, तज्ज्ञ शिक्षक यांचे दर शनिवारी मार्गदर्शन यातून दप्तरमुक्त शाळा संकल्पना राबविली. या उत्कृष्ठ कार्यामुळे मागील वर्षीचा जिल्हा शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला होता.  त्यांच्या शाळेलाही या वर्षी जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांकाचा मानाचा अध्यक्ष चषक प्राप्त झाला आहे. लोकसहभागातून सोयीसुविधायुक्त आदर्श डिजीटल शाळेची निर्मिती त्यांनी केली आहे.

वेल्हाळ या नांदूर येथील जिल्हापरिषद शाळेत काम करीत असून यांना या वर्षीचा राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या "बीजाकडून तेजाकडे" या नवोपक्रमाची निवड झाली आहे. भिन्न बोलीभाषा असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांद्वारे शाळेची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. त्यांनी रचनावाद, कृतीयुक्त अध्ययन पद्धतीने वर्ग व शाळा 100% प्रगत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लोकसहभागातून शाळा सुसज्ज व डिजीटल केली आहे.

Web Title: teacher innovation award to velhal modhave