भारतात शिक्षकांना आदर मिळत नाही - डॉ. शां. ब. मुजुमदार

पुण्याई सभागृह - प्रा. डॉ. हेमंत अभ्यंकर सत्कार समितीतर्फे प्रा. हेमंत अभ्यंकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी (डावीकडून) रामराजे नाईक निंबाळकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. अभ्यंकर.
पुण्याई सभागृह - प्रा. डॉ. हेमंत अभ्यंकर सत्कार समितीतर्फे प्रा. हेमंत अभ्यंकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी (डावीकडून) रामराजे नाईक निंबाळकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. अभ्यंकर.

पुणे - एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना हरवून जात असेल तो सर्वांत चांगला शिक्षक असतो. शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांना सर्वस्तरांतून आदर मिळणे आवश्‍यक आहे. परंतु दुर्दैवाने भारतात शिक्षकांना मान-सन्मान मिळत नाही, अशी खंत सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केली.

प्रा. डॉ. हेमंत अभ्यंकर सत्कार समितीतर्फे शिक्षक, संशोधक, विविध शिक्षण संस्थांमध्ये संचालक व प्रशासक असलेले प्रा. डॉ. हेमंत अभ्यंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यासोबत डॉ. अभ्यंकर लिखित ‘अभियांत्रिकीचा शिक्षक का? आणि कसा?’ व हेमंतरंग गौरवांक या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी विशेष उपस्थिती डॉ. मुजुमदार, अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रमोद चौधरी, प्राजच्या संचालिका परिमल चौधरी, अभिनेते राहुल सोलापूरकर आदी 
उपस्थित होते.

डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘‘आपल्या इथे फक्त शिक्षक दिन साजरा करून सन्मान मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला जर विकसित देशाकडे वाटचाल करायची असेल तर शिक्षकांना सन्मान द्यायला हवा.’’

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘समाजाच्या विकासासाठी शिक्षणाची जोड असणे महत्त्वाचे आहे. ’’  प्रा. अभ्यंकर म्हणाले, ‘‘ पैशांसाठी, गरजेसाठी शिक्षक काहीही करू लागले आहेत. या गोष्टींकडे ज्यांनी काणाडोळा करायला नको त्यांनीच केला आहे. यावर उपाय म्हणजे शिक्षकांनी फक्त जीव तोडून शिकवायला हवे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com