छडी लगे छमछम, विद्या येई घमघम काळाच्या पडद्याआड

मिलिंद संगई
रविवार, 8 जुलै 2018

राज्य शासनाने या बाबत सर्व शाळांना परिपत्रक पाठविले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांनी या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे या पुढे कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक अथवा मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये, असे निर्देश  दिले आहेत. त्याचे पालन सर्वांनी करावे असे परिपत्रक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी काढले आहे.

बारामती : छडी लगे छमछम.. विद्या येई घमघम.. ही उक्ती आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे.

राज्य शासनाने या बाबत सर्व शाळांना परिपत्रक पाठविले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांनी या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे या पुढे कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक अथवा मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये, असे निर्देश  दिले आहेत. त्याचे पालन सर्वांनी करावे असे परिपत्रक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी काढले आहे.

या संदर्भात प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या कार्यशाळा आयोजित करून माहिती द्यावी व मुलांना शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागू नये याची काळजी घ्यावी असे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या पुढील काळात मुलांच्या अंगाला हात न लावता शिक्षकाना त्यांना शिकवावे लागणार आहे.

Web Title: teacher punishment in school government rule