Teacher Recruitment : शिक्षक भरतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार - दीपक केसरकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिंदू नामावलीमधील त्रुटी आणि बिंदू नामावली अद्ययावत करण्यात होत असलेली दिरंगाईमुळे राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडली आहे.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal

पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिंदू नामावलीमधील त्रुटी आणि बिंदू नामावली अद्ययावत करण्यात होत असलेली दिरंगाईमुळे राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान,बिंदू नामावलीतील त्रुटी दूर करून ती अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या दिरंगाईमुळे शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

राज्यात सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. याला उत्तर देताना केसरकर यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ६० हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यापैकी ३० हजार शिक्षकांची भरती लवकरच करण्यात येईल, अशी घोषणा केसरकर यांनी मागील अधिवेशनात केली होती. परंतु अद्याप शिक्षक भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नसल्याचे निदर्शनास येते.

तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले, ‘शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरू झाले आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिंदू नामावलीमध्ये त्रूटी असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या आहेत. बिंदू नामावलीतील त्रूटी दूर करून बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत शासन स्तर तसेच आयुक्त स्तरावरून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बिंदुनामावली अद्ययावत करण्यात आली आहे.’

राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांकनानुसार आणि पवित्र पोर्टलमार्फतच भरण्यात येणार आहेत, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com