शिक्षक, पदवीधरच्या मतदानावर बहिष्कार

शिक्षक, पदवीधरच्या मतदानावर बहिष्कार
Published on: 

शिक्षक, पदवीधरच्या मतदानावर बहिष्कार
कॉलेज कर्मचारी युनियन : प्रलंबित मागण्यांसाठी निर्णय

सोलापूर, ता. १८ : रखडलेली नोकरभरती, अनुकंपा तत्त्वावरील रिक्त पदे आणि १०, २०, ३० वर्षांच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीसाठी सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनने विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधरच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांतील पात्र मतदारांनी या निर्णयात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
राज्यात २०१३ पासून महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोकरभरती झालेली नाही. अनुकंपा तत्त्वावरील पदेही रिक्त असल्याने महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अपुऱ्या मनुष्यबळावर सुरू आहे. दुसरीकडे, राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला असताना शिक्षकेतर कर्मचारी मात्र त्यापासून वंचित आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मागण्यांबाबत अनेकदा आश्वासने दिली, मात्र त्यांची पूर्तता झाली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने शासनाच्या भूमिकेच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले यांनी सांगितले. बहिष्कारात सहभागी होण्याचे आवाहन सिनेट सदस्य अजित संगवे, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर आणि खजिनदार राहुल कराडे यांनी केले आहे.

कोट
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. नोकरभरती आणि अनुकंपा पदांचा प्रश्न प्रलंबित असताना प्रगती योजनेच्या लाभापासूनही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे निषेध म्हणून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
- दत्ता भोसले, जिल्हाध्यक्ष, कॉलेज कर्मचारी युनियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com