आम्हालाही द्या पाच दिवसांचा आठवडा; पाहा कोण करतेय 'ही' मागणी

Teachers demanding five day week to CM uddhav Thackeray
Teachers demanding five day week to CM uddhav Thackeray

पुणे : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवारी व रविवारी सुटी जाहीर केली आहे. परंतु, त्यात शिक्षकांचा समावेश नाही. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, अशी मागणी शिक्षक हितकारिणी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात सीबीएससी, इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांना शनिवारी व रविवारी सुटी असते. राज्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळाही अशा सुट्या देतात. शासनाने सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळांच्या सोमवार ते शुक्रवार या कामाच्या वेळेत वाढ करावी. त्याऐवजी शनिवारी व रविवारी सुटी दिल्यास विद्यार्थी व शिक्षकांवरील ताण कमी होईल, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी केली आहे. 

पुणे रेल्वे स्टेशनवरून कोणत्या गाड्या केल्या रद्द? का? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com