esakal | शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम नको; कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे धरणे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh-Deshmukh

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणाचे काम देऊ नये आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांना 50 लाखांच्या विम्याची रक्कम त्वरित द्यावी आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणीत शिक्षक आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम नको; कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे धरणे आंदोलन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणाचे काम देऊ नये आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांना 50 लाखांच्या विम्याची रक्कम त्वरित द्यावी आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणीत शिक्षक आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कास्ट्राईब शिक्षक आघाडीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात संघटनेचे अतिरिक्त महासचिव गौतम मगरे,दादा डाळिंबे, चंद्रकांत सलवदे, मिलिंद थोरात, विठ्ठल सावंत, बाळू लोंढे, नीलेश शिर्के, संदीप कदम, सतीश कोळपे, अवधूत कांबळे, कृष्णा काळेल,आनंद बनसोडे,दीपक कदम आदींसह मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.

पीएमपी प्रवाशांचा दिलासा लांबला; 'डेली पास'चा निर्णय होणार पुढच्या बैठकीत

दौंडचे आमदार राहुल कुल, नगराध्यक्षा शीतल कटारिया, दौंडच्या नागरी हित संरक्षण मंडळाचे उपाध्यक्ष योगेश कटारिया, भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षकांच्या मागण्या जाणून घेतल्या. दरम्यान, शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन कुल यांनी शिक्षकांना दिले.

मराठा आरक्षणाविषयी पुण्यात 'विचार मंथन'; बैठकीला दिग्गज लावणार हजेरी!

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेत प्राथमिक शिक्षकांना आरोग्य सर्वेक्षणाचे काम देऊ नये, इंदापूर तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक सोपान कांबळे यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांना तत्काळ निलंबित करावे, कोरोनाने मृत्यू पडलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांच्या विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात यावी आणि 50 लाख रुपयांच्या विमा सुरक्षा योजनेचा कालावधी वाढविण्यात यावा आदी मागण्या जिल्हाधिकारी देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Edited By - Prashant Patil

loading image