Teachers Fasting : शिक्षकांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित

शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतन आदेशाचे पत्र दिल्याने तिसऱ्या उपोषण मागे घेण्यात आले.
Teachers Fasting
Teachers Fastingsakal

कात्रज - शासन निर्णयानुसार २० टक्के वेतन मिळावे या मागणीसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतन आदेशाचे पत्र दिल्याने तिसऱ्या उपोषण मागे घेण्यात आले. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर येथील राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयास शासन निर्णयानुसार २० टक्के अनुदान मिळाले आहे. चार वर्षे वेतन मिळाले.

मात्र जानेवारी २०२० पासून शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक यांनी पूर्वकल्पना न देता वेतन बंद केले. तेव्हापासून अर्ज, विनंत्या व निवेदने देऊन वेतानाबाबत कार्यवाही होत नसल्याने सोमवार (ता. ४) पासून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर शिक्षकांनी आमरण उपोषण सुरू केले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी याची दखल घेत शिक्षणाधिकारी यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी अधीक्षक वेतन पथक यांना वेतानाबाबत आदेशीत केले. या पत्राची प्रत उपोषणकर्ते शिक्षकांना देत वेतनाची हमी दिल्याने तिसऱ्या दिवशी उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण व विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांच्या हस्ते नारळपाणी देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी महासंघाचे पुणे जिल्हाधक्ष नारायण शिंदे, सचिव जितेंद्र पायगुडे व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

शिक्षणाधिकारी यांनी वेतन अदा करण्याबाबत वेतन पथक अधीक्षक यांना आदेशीत करत वेतनाची हमी दिल्याने आमरण उपोषण स्थगित करत आहोत. चार वर्षानंतर शिक्षकांच्या हक्काच्या वेतनाचा प्रश्न सुटत आहे.

- नागनाथ काळे, मुख्याद्यापक राधाकृष्ण प्राथमिक विद्यालय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com