ऑनलाइन अध्यापन सोडून शिक्षकांना करावा लागतोय दारोदारी फिरून सर्व्हे

निलेश बोरुडे
Sunday, 27 September 2020

कोरोनाच्या कामातून शिक्षकांना वगळण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असताना शिक्षकांना कोविड सर्वेक्षण करण्यासाठी ऑनलाइन अध्यापन सोडून दारोदारी फिरावे लागत असल्याने याविरोधात शिक्षक संघटनांनी हवेली गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, हवेली तहसिलदार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले असून शिक्षकांना या सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त करण्याची मागणी केली आहे.

किरकटवाडी (पुणे) : कोरोनाच्या कामातून शिक्षकांना वगळण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असताना शिक्षकांना कोविड सर्वेक्षण करण्यासाठी ऑनलाइन अध्यापन सोडून दारोदारी फिरावे लागत असल्याने याविरोधात शिक्षक संघटनांनी हवेली गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, हवेली तहसिलदार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले असून शिक्षकांना या सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त करण्याची मागणी केली आहे.
             

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यंत शिक्षकांनी तपासणी नाक्यावर, आरोग्य तपासणी पथक, स्वस्त धान्य दुकान, ज्येष्ठ नागरिक सर्वेक्षण, कोविड सेंटर अशा ठिकाणी प्रामाणिकपणे न तक्रार करता काम केलेले आहे; परंतु आता शिक्षकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये अशी विनंती निवेदनातून करण्यात आलेली आहे. दररोज सर्वेक्षणासाठी जावे लागत असल्याने ऑनलाइन अध्यापन करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणातही खंड पडत आहे. तसेच सर्वेक्षणासाठी जाणाऱ्या शिक्षकांना कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने पुरेसे साहित्य न दिल्यामुळे शिक्षकांमध्येही भीतीचे वातावरण असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. हवेली तालुक्यातील 160 शिक्षकांच्या निवेदनावर सह्या असून जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष सागर शिंदे, अमोल गायकवाड व राजेश कांबळे निवेदन देताना उपस्थित होते.

‘न्यू नॉर्मल’ला हवी संयम, शिस्तीची जोड

"महिला शिक्षकांना तालुक्याच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना प्रवासामुळे प्रचंड त्रास होतो. सलग आठ ते नऊ दिवस सर्व्हे केल्यामुळे शिक्षकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. तसेच ग्रामिण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून या सर्व्हे कामातून शिक्षकांना वगळावे."
-तृप्ती तोडकर, कार्याध्यक्षा, जुनी पेन्शन हक्क संघटना, हवेली तालुका.
  

चुकांची ‘उत्सवी’ पुनरावृत्ती ठरेल घातक...

 "हवेली तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांसह तर विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचीही मदत घेण्यात आलेली आहे. सामूहिक जबाबदारी म्हणून व्यापक सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये शिक्षकांचे योगदान खूप मोठे आहे.आता तालुक्यातील इतर शिक्षकांना सर्वेक्षणासाठी न बोलवता त्या-त्या परिसरातील शिक्षक व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची सर्वेक्षणासाठी मदत घेतली जाणार आहे."

-प्रशांत शिर्के, गटविकास अधिकारी, पंचायत समिती हवेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers have to leave online teaching and do door-to-door survey