
टीव्हीवर कार्टून बघण्यास घरातील लोकांनी विरोध केल्यामुळे 13 वर्षाच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बिबवेवाडी येथे मंगळवारी दुपारी 4 वाजता घडली. याप्रकरणी बिबबवेवाड़ी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पुणे - टीव्हीवर कार्टून बघण्यास घरातील लोकांनी विरोध केल्यामुळे 13 वर्षाच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बिबवेवाडी येथे मंगळवारी दुपारी 4 वाजता घडली. याप्रकरणी बिबबवेवाड़ी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आत्महत्या केलेला मुलगा बिबवेवाडीतील राजीव गांधी परीसरामध्ये त्याच्या कुटुंबासह राहतो. बिबबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडील मद्यपी आहेत, तर आई गृहिणी आहे. संबंधित मुलगा मंगळवारी सकाळपासुन टीव्हीवर कार्टून बघत होता.
उरुळी कांचनमध्ये महिला राजकीय पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह!
दरम्यान, त्यास आई व आजीने टीव्ही बंद करण्यास सांगितले. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याच्या बहिणीने त्याच्या हातातील रिमोट घेऊन टीव्ही बंद केला. त्यामुळे मुलगा संतप्त होऊन वरती राहणाऱ्या मामाच्या घरामध्ये गेला. त्यानंतर त्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ मुलगा बाहेर न आल्याने आईने दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी त्यास तत्काळ खासगी रुग्णलयात नेले, त्यावेळी डॉक्टरानी त्यास मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्चेदनासाठी ससुन रुग्णलयत नेला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक किरण लिट्टे करीत आहेत.