उरुळी कांचनमध्ये महिला राजकीय पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह!

CoronaVirus
CoronaVirus

उरुळी कांचन - पंचायत राज व्यवस्थेत काम करणाऱ्या उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी (ता. ९) रात्री उशिरा निष्पन्न झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, याबाबत उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी, डॉ. सुचिता कदम यांनी दुजोरा दिला आहे. 

संबधित महिला पदाधिकाऱ्यास एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली आहे. 

उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्यास कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्याने, संबंधित पदाधिकाऱ्यांचा स्वॅब सोमवारी (ता. ८) रात्री उशिरा पुणे येथील शासकीय प्रयोग शाळेत पाठवला होता. हा तपासणी अहवाल मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास आला. यात संबधित महिला पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. 

लोणी काळभोर येथील खासगी रुग्नालयात १७ एप्रिलला उपचार घेत असलेली उरुळी कांचन येथील एक सत्तेचाळीस वर्षीय महिला, ही पूर्व हवेलीमधील कोरोनाचा पहिला रुग्न ठरली होती. त्यानंतर छप्पन दिवसांच्या कालावधीत उरुळी कांचन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, कदमवाकवस्ती या पूर्व हवेलीमधील विविध गावात 20हून अधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्न आढळून आले आहेत. यापैकी तीन जनांचा मृत्यु झाला तर सतरा रुग्न बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, वरील राजकीय महिला पधाधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने, उरुळी कांचन व परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. 

याबाबत अधिक माहिती देतांना डॉ. सुचिता कदम म्हणाल्या, 'उरुळी कांचन येथील राजकीय महिला पदाधिकाऱ्याचा कोरोना रिपोर्ट येताच, संबधित महिला पदाधिकारी राहत असलेला परीसर सील करण्यात आला आहे. तर संबधित महिला पदाधिकाऱ्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. संबधित महिला पदाधिकाऱ्यांचे घरातील नातेवाईक व संपर्कात आलेल्या लोकांना घरातच कोरोटांईन करण्यात आले आहे.' 

 कोरोटांईन करण्यात आलेल्यांना स्वॅब तपासणीसाठी लोणी काळभोर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये नेण्यात येणार आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये स्वॅब घेतल्यानंतर, स्वॅब तातडीने पुण्यातील शासकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे. संबधित महिला पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचे कोरोना अहवाल आल्यानंतरच, महिला पदाधिकाऱ्यांचे घरातील नातेवाईक व संपर्कात आलेल्यापैकी कोणी कोरोना बाधीत आहे की नाही हे समजणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com