NEET Result 2020: आशिष झानते राज्यात पहिला, तर पुणेकर तेजोमय वैद्य दुसरा!

Tejomay_Vaidya
Tejomay_Vaidya

पुणे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (एनटीए) वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या पात्रता परीक्षेचा (नॅशनल इलिबीजीटी एंट्रन्स टेस्ट- नीट) निकाल शुक्रवारी (ता.16) रात्री जाहीर झाला. 'नीट' देणारे महाराष्ट्रातील 40.94 टक्के विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. देशातील पहिल्या 50 मध्ये राज्यातील चौघांचा समावेश आहे. आशिष झानते हा 720 पैकी 710 गुण घेऊन देशात 19 वा रॅंक मिळवला आहे. पुण्याचा तेजोमय वैद्य याने 705 गुण घेऊन राज्यात दुसरा तर देशात 43 वा रॅंक मिळवला आहे. त्या खालोखाल पार्थ कदमने 705 गुणांसह देशात 45 वा, तर अभय चिल्लरगेने 705 गुणांसह 46 वा रॅंक पटकावला आहे.

'नीट'साठी महाराष्ट्रातून 2 लाख 27 हजार 659 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यापैकी 1 लाख 95 हजार 338 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 'कोरोना'मुळे ही परीक्षा लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळाला होता, पण तरीही वैद्यकीय प्रवेशासाठी 77 हजार 974 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. 40.94 टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. 2019 मध्ये 39.26 टक्के विद्यार्थी पात्र होते, त्यामुळे यंदाच्या निकालात गेल्या वर्षीपेक्षा थोडी सुधारणा झाली आहे.

तिसऱ्या पिढीची वैद्यकीय सेवा
महाराष्ट्रात दुसरा आलेल्या तेजोमय वैद्य याच्या घरात वैद्यकीय सेवेची परंपरा तीन पिढ्यांपासून चालत आली आहे. तेजोमयचे आजोबा विद्याधर वैद्य हे डॉक्‍टर होते. तर त्याचे वडील नरेंद्र वैद्य हे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयातून तेजोमय इयत्ता 12वीत उत्तीर्ण झाला आहे. 'सकाळ'शी बोलताना तेजोमय म्हणाला, ''माझ्या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी हे यश संपादन करू शकलो आहे. ज्या वेळी मी 11वीत गेलो तेव्हा मला 'नीट'बद्दल जास्त काही माहिती नव्हते, त्यांनी माझ्याकडून सर्व तयारी करून घेतली. त्यांनी जे जे काही सांगितले त्याच पद्धतीने मी अभ्यास केला. कोरोनामुळे आपल्या हातात काहीच नव्हते, मला जे शक्‍य होते ते केले आणि मला हे यश मिळाले. याचे सर्व श्रेय माझे शिक्षक व आईवडिलांना देतो.

''कोरोनामुळे परीक्षा पुढे गेल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळाल्याने विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. 600 पेक्षा जास्त गुण घेणारे देशात सुमारे 16 ते 17 हजार विद्यार्थी आहेत. गेल्यावर्षी ही संख्या साडे सात हजार होती. यंदाचा निकाल चांगला लागल्याने शासकीय महाविद्यालयांचा कटऑफ 20 ते 25 गुणांनी वाढणार आहे. आपले विद्यार्थी क्रॅशकोर्सवर अवलंबून रहात असल्याने निकालाची टक्केवारी कमी आहे.''
- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र

''नीट'चा निकाल अप्रतिम लागला असून, निकालाची टक्केवारी वाढली आहे. आमच्या क्‍लासेसचे 12 विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त गुण आहेत. 'कोरोना'च्या काळात परीक्षा पुढे गेलेली असताना विद्यार्थ्यांनी त्यांची सहनशक्ती दाखवत ऑनलाइन पद्धतीने अभ्यास केला. अभ्यासाची नवीन पद्धत अंगिकारताना विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचेही कौतुक केले पाहिजे. महाराष्ट्राचा निकाल वाढविण्यासाठी 11वीपासूनच 'नीट'ची तयारी करणे गरजेचे आहे.''
- संदीप देवधर, संस्थापक संचालक, देवधरस ऍकडमी ऑफ एक्‍सलन्स (डीएई)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com