esakal | Rain Updates: अतिवृष्टीचा पुणे विभागाला तडाखा; २८ जणांनी गमावला जीव, हजारोंचं स्थलांतर
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Flood

पुणे विभागात दोन हजार 319 घरांची पडझड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

Rain Updates: अतिवृष्टीचा पुणे विभागाला तडाखा; २८ जणांनी गमावला जीव, हजारोंचं स्थलांतर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील कोल्हापूर वगळता चार जिल्ह्यांमध्ये 28 नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकजण बेपत्ता आहे. वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे 21 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच, 57 हजार 354 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

सुनेनं बळकावलेल्या घराचा ताबा मिळाला सासूला; घटस्फोटानंतरही राहत होती घरात​

पुणे विभागातील सोलापूर, सांगली, पुणे आणि सातारा जिल्ह्याला बुधवारी (ता. 14) झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस तालुक्‍यांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील पुणे शहरासह, हवेली, बारामती, इंदापूर, दौंड आणि सासवड तसेच सांगली जिल्ह्यात मिरज, वाळवा, तासगांव आणि पलूस तालुक्‍यांमध्ये शंभर मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे आणि भिंत पडून पुणे जिल्ह्यात चार, सातारा एक, सांगली नऊ आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुणे जिल्ह्यात एकजण बेपत्ता आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल; शहरातील परिस्थितीबाबत ठरवले जबाबदार! 

पुणे विभागात दोन हजार 319 घरांची पडझड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या जिल्ह्यातील 17 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. पुणे जिल्ह्यातील तीन हजार नागरिकांना, सांगली जिल्ह्यात एक हजार 79 आणि सातारा जिल्ह्यातील 213 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच, सोलापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांत 513 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती विभागीय आयुक्‍तालयाकडून देण्यात आली. 

पडझड झालेल्या घरांची संख्या : 
पुणे - 13 
सातारा - 267 
सांगली - 323 
सोलापूर - 1716 

जिल्हानिहाय पिकांचे नुकसान, हेक्‍टरमध्ये : 
पुणे : ऊस, सोयाबीन, भाजीपाला, डाळिंब, भात (18 हजार 746 हेक्‍टर) 
सातारा : भात, भाजीपाला, ऊस आणि सोयाबीन ( एक हजार 420 हेक्‍टर) 
सांगली : सोयाबीन, ऊस, कापूस, डाळिंब, तूर, भाजीपाला (दोन हजार 400 हेक्‍टर) 
सोलापूर : सोयाबीन, ऊस, कापूस, डाळिंब, तूर, भाजीपाला (34 हजार 788 हेक्‍टर)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)