टेमघर धरण 100 टक्के भरले; विसर्ग सुरू

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

टेमघर-
182/3402/3.71/100%
तळ मोरीतून- 367क्यूसेक

पुणे : टेमघर धरण सोमवारी (ता. 5) रात्री 10 वाजता 100 टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यातून एक हजार क्यूसेक पेक्षा जास्त विसर्ग सोडला जात आहे.

हा विसर्ग सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाहीत. धरण 100 टक्के भरल्यानंतर धरणात जमा होणारे अतिरिक्त पाणी धरणातून आपोआप बाहेर सोडले जाते. येथील तळ मोरी व सांडव्यातून अंदाजे एक हजार 375 क्यूसेक 
पेक्षा जास्तीचा विसर्ग सुरू आहे. अशी माहिती भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता सुनील प्रदिक्षणे यांनी सांगितले. 

टेमघर धरण मुठा नदीवर टेमघर व लव्हार्डे या गावाच्या ठिकाणी 1990च्या दशकात बांधले. याची एकूण उपयुक्त साठवण क्षमता 3.71 टीएमसी आहे. 2016 2017मध्ये या धरणाच्या गळतीचे प्रमाण जास्त असल्याने ते धरण 100 टक्के पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. सध्या दुरुस्तीचे काम शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे दुरुस्तीनंतर यंदा 100 टक्के भरले असे ही अशी माहिती भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता सुनील प्रदिक्षणे यांनी सांगितले. 

खडकवासला धरण साखळीतील स्थिती
6.8.2019/सकाळी सहा वाजता
धरणाचे नाव- पाऊस (मिमी)/ 1जून पासूनचा पाऊस(मिमी)/एकूण उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी मध्ये)/टक्केवारी/ विसर्ग (क्यूसेकमध्ये)

खडकवासला- 
42/904/1.97/100%
कालवा- 1हजार 054 क्यूसेक
मुठा नदीत- 45 हजार 474 क्यूसेक

पानशेत-
129/2473/10.65/100 टक्के
आंबी नदीत विसर्ग- 9 हजार 892क्यूसेक

वरसगाव-
138/2469/12.82/100%
मोसे नदीत- 3हजार 412क्यूसेक
वीज निर्मिती- 610क्यूसेक

टेमघर-
182/3402/3.71/100%
तळ मोरीतून- 367क्यूसेक

चार धरणातील एकूण पाणीसाठा-
29.15टीएमसी/100टक्के

मागील वर्षीचा पाणीसाठा-
25.68टीएमसी/ 88.08टक्के


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temghar dam filled 100 percent