esakal | 'अम्फान' चक्रीवादळाचा परिणाम; पुण्यासह राज्यात दिवसा पारा चढणार!
sakal

बोलून बातमी शोधा

the temperature of the day will rise in the state including Pune.jpg

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या "अम्फान' या अतितीव्र चक्रीवादळाचा परिणाम राज्यावरही पहायला मिळाला होता. दुपारनंतर पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रस्त केले होते. चक्रीवादळ आता शांत झाले असून आता राज्यातील आकाश मुख्यत्वे निरभ्र असणार आहे

'अम्फान' चक्रीवादळाचा परिणाम; पुण्यासह राज्यात दिवसा पारा चढणार!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : अवकाळी पावसाने त्रस्त असलेल्या राज्यातील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. निदान बुधवार (ता.27) पर्यंत तरी संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे आकाश निरभ्र असणार आहे. तसेच राज्यातील तापमानात अंशतः वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही विभागाने दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या "अम्फान' या अतितीव्र चक्रीवादळाचा परिणाम राज्यावरही पहायला मिळाला होता. दुपारनंतर पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रस्त केले होते. चक्रीवादळ आता शांत झाले असून आता राज्यातील आकाश मुख्यत्वे निरभ्र असणार आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी (ता.23) राज्यातील सर्वाधिक तापमान नागपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस असे नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात किंचितशी वाढ झाली असली तरी उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लोहगावची चाळीशी पार 
पुणे शहर आणि परिसरातील सरासरी तापमानात शुक्रवारच्या (ता.22) तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढ होत ते 39.8 अंश सेल्सिअसवर पोचले. तर शहरात सर्वाधिक तापमान लोहगाव येथे 41 अंश सेल्सिअस असे नोंदविले गले. शनिवारी शहरातील आकाश मुख्यत्वे निरभ्र आणि हवामान कोरडे होते. सोमवार (ता.25) पर्यंत आकाश निरभ्र तर तापमानात किंचितशी वाढ हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. तसेच, मंगळवार (ता.26) नंतर दुपारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता विभागाने वर्तवली आहे. 

 बारामतीतील माळेगाव कारखान्याच्या टाकीत आठ जण गुदमरले
 

वार कमाल तापमान किमान तापमान (अंश सेल्सिअस) 
बुधवार 37.2 22.6 
गुरुवार 38.2 23.6 
शुक्रवार 37.8 23.8 
शनिवार 39.8 20.9 


विद्यार्थ्यांनो, पुणे विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय; द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम....