कमाल तापमानाचा पारा वाढणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

पुणे - राज्यात शनिवारी सर्वाधिक तापमानाची नोंद भिरा येथे 42.5 अंश सेल्सिअस झाली. तर सर्वांत कमी तापमानाची नोंद जळगाव येथे 18.6 अंश सेल्सिअस झाली. पुण्याचा कमाल तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअस होता. पुढील दोन दिवसांत पुण्याच्या तापमानाचा पारा अंशतः वाढेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, ईशान्य मध्य प्रदेश ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत विदर्भ व मराठवाड्यातून जाणारे द्रोणीय क्षेत्र आता उत्तर कर्नाटकपर्यंत आले आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मराठवाड्यातील काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत काही अंशी वाढ झाली आहे. बुधवारपर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहील.

Web Title: temperature increase in pune