पुण्यात तापमान पुन्हा चाळिशी ओलांडणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

पुणे  - शहर आणि परिसरात पुढील चोवीस तासांमध्ये कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीवर जाईल, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला आहे. विदर्भात पडलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे वैशाख वणव्याची दाहकता कमी झाली आहे. राज्यात सर्वांधिक तापमान मालेगाव येथे 44.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

पुण्यात कमाल तापमानाचा पारा 39.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. लोहगाव येथे 40.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

विदर्भात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते लक्षद्वीप बेटापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे विदर्भातील काही भागांत दुपारनंतर अचानक ढग गोळा होऊन वादळी वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, सकाळपासून वाऱ्यामुळे उन्हाचा ताप काहीसा कमी झाला आहे. 

उन्हाचा चटका वाढतोय 
गेले काही दिवस सातत्याने कमाल तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस असलेला चंद्रपूरचा पारा कमी 42.2 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला आहे. पुण्यात मात्र उन्हाचा चटका वाढत आहे. आकाश निरभ्र असल्याने शहर आणि परिसरात पुढील चोवीस तासांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

Web Title: Temperature in Pune again crosses 40