esakal | अरे वा, बारामतीतून दिसतंय शिखर शिंगणापूरचं मंदिर...व्हिडिओ पहा 
sakal

बोलून बातमी शोधा

shingnapur

कोरोनाने जसा अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे, त्याच पध्दतीने प्रदूषणाची पातळीही कमालीची घटली आहे. वातावरण इतके स्वच्छ झाले आहे की, बारामती तालुक्यातील काटेवाडीतून थेट 60 किलोमीटर अंतरावरील शिखर शिंगणापूरचे मंदिर दिसू लागले आहे

अरे वा, बारामतीतून दिसतंय शिखर शिंगणापूरचं मंदिर...व्हिडिओ पहा 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाने जसा अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे, त्याच पध्दतीने प्रदूषणाची पातळीही कमालीची घटली आहे. वातावरण इतके स्वच्छ झाले आहे की, बारामती तालुक्यातील काटेवाडीतून थेट 60 किलोमीटर अंतरावरील शिखर शिंगणापूरचे मंदिर दिसू लागले आहे.

आणखी वाचा -  कोरोनाच्या लढाईत पुरंदरला पहिल्यांदा दिलासा

बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील हौशी छायाचित्रकार मंगेश काटे यांना काटेवाडी येथील त्यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून छायाचित्र काढताना लांबचे डोंगर दिसले. जेव्हा त्यांनी बारकाईने पाहिले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, वातावरण स्वच्छ असल्याने डोंगरावरचे शिखर शिंगणापूरचे मंदिर आहे. अगदी काटेवाडीत बसून ते स्पष्टपणे दिसते आहे. त्यांनी हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात टिपला. 

आणखी वाचा - पुण्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला एक लाखांचा टप्पा

शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील आणि सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक गाव आणि धार्मिक ठिकाण आहे. येथे शंभू महादेवाचे मंदिर आहे. शिखर शिंगणापूर येथे दोन कावडींना मान आहे. सासवड येथील भुतोजी तेली व कोरेगाव कुमठे येथील वाघाची कावड. शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या मंदिराचेही वेगळे वैशिष्टय आहे. स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून त्याकडे पाहिले जाते.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रदूषण वाढल्यामुळे व पर्यावरण कमी झाल्यामुळे हे मंदिर दूरवरुनही दिसत नसे. मात्र, लॉकडाउनच्या काळात वाहनांची मंदावलेली वर्दळ, कमी झालेले प्रदूषण व स्वच्छ हवा या मुळे काटेवाडीतूनही थेट शंभू महादेवाचे मंदिर कॅमेऱ्यातून झूम करुन स्पष्टपणे पाहता येते. मंगेश काटे यांनी जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल केला, तेव्हा अनेकांचाही या वर विश्वासच बसत नव्हता. मात्र, तंत्रज्ञानाची कमाल असल्याने हे दिसले.