Accident : टेम्पो व रिक्षा अपघातात तरुणाचं मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

बदामी हौद चौक ते ईशान्य मॉल या रस्त्यावर दोन वाहनांच्या धडकेत एका तरुणाला जीव गमवावा लागला.
Rickshaw Accident
Rickshaw Accidentsakal

विश्रांतवाडी - बदामी हौद चौक ते ईशान्य मॉल या रस्त्यावर दोन वाहनांच्या धडकेत एका तरुणाला जीव गमवावा लागला. शांतीरक्षक सोसायटीच्या गेटसमोर सोमवारी रात्री टेम्पो व रिक्षा यांच्या झालेल्या या अपघातात रिक्षातील यश बाळासाहेब खरचंद (वय-18 वर्षे, रा. महाराष्ट्र हौ. बोर्ड, येरवडा) या तरुणाचा अपघातानंतर उपचार चालू असताना मंगळवारी मृत्यू झाला. तर रिक्षाचालकासह दोन तरुणीदेखील जखमी झाल्या आहेत.

यश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याच्या पश्‍चात आईवडील व दोन बहिणी आहेत. याप्रकरणी टेम्पोचालक नाझीम बाबूलाल सय्यद (वय-42, रा. नागपूर चाळ, येरवडा) याला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी या रस्त्यावर अवजड वाहनांवर, तसेच बेकायदेशीरपणे थांबणार्‍या खासगी वाहनांवर कारवाई करावी, संपूर्ण परिसर रहिवासी झोन असल्याने हा रस्ता ‘नो पार्किंग झोन’ करावा, अशी मागणी करीत वाहतूक पोलिसांना घेराव घातला.

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रभाग क्र. 2 मध्ये वाहतूक नियमांचा बोजवारा उडाला आहे. नियमाचे उल्लंघन करून उभारलेल्या टपर्‍या, रस्त्यावर मांडलेले टेबल-खुर्च्या, रस्त्यावर जागा मिळेल तेथे उभी राहणारी वाहने, तसेच आयटी कंपनी कर्मचार्‍याना ने-आण करणारी वाहने उभी असतात. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे.

महापालिका आणि वाहतूक विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याने आज झालेल्या अपघातात तरुणाला जीव गमवावा लागल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी करीत काही काळ रास्ता रोको केला.

माजी नगरसेवक सिद्धार्थ धेंडे म्हणाले, येरवडा पोस्ट कार्यालय ते बदामी चौक, शास्त्रीनगर या भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर वाहतूक विभागाने जड वाहनांस बंदीही केली आहे. मात्र, याची अमंलबजावणी करण्यासाठी वाहतूक विभागाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. या रस्त्यावर योग्य ती उपाययोजना करावी, अशा मागणीचे वाहतूक पोलीस उपायुक्तांन देण्यात आले आहे.

यासंदर्भात शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष साम्राज्य प्रतिष्ठानचे महेश पाटील म्हणाले की या ठिकाणी आयटी कंपन्यांची वाहने उभी केली जातात, जवळपास 30 ते 40 वाहने उभी असतात त्यांच्याकडून वाहने पार्क करण्याचे प्रत्येक वाहनामागे 100 रुपये घेतले जातात. या वाहनांमुळे रस्ता अरुंद होत असल्याची वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. आता गतिरोधक व नो पार्किंग झोनची मागणी करण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक शंखे यांनी नो पार्किंग झोन करू असे आश्वासन दिले व गतिरोधकबद्दल महानगरपालिकेकडे पत्र द्या असे सुचविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com