

Pune Police take strict action, externing 10 notorious criminals from the district.
esakal
पुणे: शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी दहा सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दीर्घ कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. तर, इतर १३५ गुन्हेगारांवर तीन दिवसांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.