"महावितरण'च्या ऍप्स्‌ला दहा लाख ग्राहकांचा प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

पुणे - महावितरणच्या वतीने तयार केलेल्या मोबाईल ऍप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ सात महिन्यांत सुमारे दहा लाख ग्राहकांनी हे ऍप डाउनलोड केले आहे. या ऍपद्वारे आतापर्यंत एक कोटी 70 लाख ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले आहे. तसेच सात लाख 43 हजार ग्राहकांनी त्यांच्या वीज बिलांचा भरणा करण्यासाठी या ऍपचा वापर केला आहे. 

राज्यातील सुमारे 38 हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी "कर्मचारी मित्र' हे ऍप डाउनलोड केले आहे. याद्वारे नवीन वीजजोडणी, खंडित वीजपुरवठ्याबाबत एसएमएस, अचूक वीजमीटर रीडिंग, फीडर व डीटीसी मीटर रीडिंग आदी दैनंदिन कामे करण्यात येतात. परिणामी, महावितरणच्या कामकाजात गती आल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. 

दरम्यान, महावितरणच्या सुमारे एक कोटी 4 लाख ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असून, मीटर रीडिंग, वीजबिल, ऑनलाइन बिल, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यःस्थिती, मीटर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे आदीबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहेत.

Web Title: Ten million customers response to app