पुणे : रविवार अन् सिंहगडावर...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

खडकवासला (पुणे) : रविवार अन् सिंहगडावर हजारो पर्यटकांची गर्दी हे ठरलेले समीकरण झाले आहे. सिंहगडावर दर रविवारी हजारो पर्यटक गर्दी करतात. आजच्या रविवारी देखील सुमारे साडे दहा हजार पर्यटक आले होते. गडावरील वाहन तळावर वाहन लावण्यास जागा नव्हती म्हणून गडावर जाणारी वाहतूक बंद करावी लागली होती. परिणामी अनेक पर्यटकांना गडावर जाता आले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, सकाळी व्यायामासाठी पायी आतकरवाडी चालत जाणाऱ्या पर्यटकांची देखील गर्दी वाढली होती. ही संख्या किमान अडीच हजार होती. तर "वाहनाने गडावर पर्यटकांची गर्दी आठ वाजता डोणजे मार्गे सुरू झाली होती.डोणजेच्या गोळेवाडी व कोंढणपूर अवसरवाडी मार्गे सुमारे सात ते आठ हजार पर्यटक गडावर आले होते.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला होतात तब्बल एवढे कोटी रुपये खर्च

सकाळी साडे दहा-अकरा वाजल्यानंतर वाहनतळ पूर्ण भरले होते. त्यानंतर गडावर सोडण्यात येणारी वाहतूक थांबविली होती. सिंहगड घाट रस्त्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व सुरक्षा रक्षक काम करीत होते.
वनरक्षक बाळासाहेब जिवडे म्हणाले, "गडावरील वाहनतळ वाहनांच्या पूर्ण क्षमतेने भरल्यावर गडावर जाण्यासाठी  मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र घाट रस्ता बंद केल्याने निराश होऊन पर्यटकांना डोणजे गोळेवाडी येथील टोल नाक्यावरुन परत फिरले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ten thousand tourists rush of Sinhagad on Sunday

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: