दहा गावांच्या ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

खडकवासला - महापालिकेत समावेश होणाऱ्या 34 पैकी 19 गावांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. यातील 10 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानुसार, एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. अन्य तीन गावांतून देखील किरकोळ अर्ज दाखल झाले आहेत.

खडकवासला - महापालिकेत समावेश होणाऱ्या 34 पैकी 19 गावांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. यातील 10 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानुसार, एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. अन्य तीन गावांतून देखील किरकोळ अर्ज दाखल झाले आहेत.

उत्तमनगर, कोंढवे- धावडे, किरकटवाडी, खडकवासला, लोहगाव, मांजरी बुद्रूक, साडेसतरानळी, धायरी, सूस व म्हाळंगे गावांनी बहिष्कार टाकला होता. त्यानुसार एकही अर्ज निवडणुकीसाठी दाखल झाला नाही. तर शिवणे व आंबेगाव खुर्दमधून प्रत्येकी एक अर्ज, तर केशवनगरमधून चार अर्ज दाखल झाले आहेत.

या गावातील अनेक गावातून उमेदवारी अर्जासाठी ग्रामपंचायतीकडून "ना हरकत' दाखले दिले जात नव्हते. दाखला घेण्यास कोणी आले, तर त्याची बहिष्कार टाकावा म्हणून समजूत घालण्यासाठी काही गावांत ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत परिसरात बसून होते. शिवाजीनगर येथील गोदामात काही गावांतील जेष्ठ नागरिकांनी ठिय्या मांडला होता.
बहिष्कार टाकलेल्या व आज अर्ज दाखल न झालेल्या गावातील अनेकांनी उमेदवारी अर्ज आणले आहेत. फक्त दुसऱ्या पॅनेलने भरल्यास आम्ही भरणार, या तयारीत अनेक जण होते. त्या सर्वांनी अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणी गर्दी केली होती; परंतू कोणीच अर्ज भरला नाही.

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 मे आहे. या दिवशी शिवणे, आंबेगाव खुर्द व केशवनगर येथील अर्ज मागे घेतले जातील, असा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे. तसे झाल्यास 19 पैकी 13 ग्रामपंचायतींचा बहिष्कार राहिल, असे या गावातील नागरिकांनी सांगितले.

नांदेडमध्ये सर्वाधिक 85 अर्ज
आंबेगावमधून 17 जागेसाठी 53, उंड्री 17 जागा 79 अर्ज, कोपरे 11 जागा 25 अर्ज, पिसोळी 17 जागांसाठी 80 अर्ज, नऱ्हे 17 जागा 55 अर्ज, नांदेड येथे 17 जागांसाठी 85 अर्ज दाखल झाले आहेत.

Web Title: ten village on election boycott