पूर्वीच्याच ठेकेदाराची निविदा मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीनेच फेरनिविदा प्रक्रियेत हेच काम १४९ कोटी रुपयांत करण्याची तयारी दाखविली आहे. फेरनिविदा प्रक्रियेत याच एकमेव ठेकेदाराने निविदा दाखल केल्याने त्यांना हे काम देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. 

पुणे - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीनेच फेरनिविदा प्रक्रियेत हेच काम १४९ कोटी रुपयांत करण्याची तयारी दाखविली आहे. फेरनिविदा प्रक्रियेत याच एकमेव ठेकेदाराने निविदा दाखल केल्याने त्यांना हे काम देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. 

कात्रज-कोंढवा या रस्त्याचे काम वादग्रस्त ठरले आहे. बाह्यवळण असलेल्या या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या रस्त्यावर होणारे अपघात, कोंढवा येथील खडीमशिन चौकात होणारी वाहतुक कोंडी यामुळे रस्त्याचे रुंदीकरण (८४ मीटर ) करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी प्रथम राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत संबंधित ठेकेदार कंपनीने वाढीव दराने निविदा भरली होती. त्यास मान्यता दिल्याने विरोधकांकडून टीका केली गेली. हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला होता. त्यानंतर फेरनिविदा काढली गेली. यामध्ये पूर्वीपेक्षा सुमारे ६५ कोटी रुपयांनी कमी रकमेची निविदा या कंपनीने दाखल केली होती. हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी पेढे वाटप केले. 

 रस्त्याच्या कामासाठी ‘पटेल इस्टेट रोड’ या मुंबईतील कंपनीने प्रस्तावित दराच्या २२.३० टक्के कमी दराने निविदा भरली होती. निविदाप्रक्रियेत ही एकच कंपनी सहभागी झाली होती. त्यामुळे त्यांना काम देण्यात आले आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी  सांगितले. 

या रस्त्याच्या कामाच्या निविदाप्रक्रियेत पारदर्शकता नाही. भूसंपादन केले नाही, बाधित घर, सदनिकाधारकांना काय पर्याय उपलब्ध करून दिला, याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याची टीका माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी केली आहे. 

  बंगळूर ते मुंबई आणि पुणे ते सोलापूर या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रस्ता 
    कात्रज चौक ते सासवड फाटा ( खडी मशिन चौक ) या रस्त्याची रुंदी ८४ मीटर 
    एकूण लांबी १२ किलोमीटर, मुख्य रस्ता ६० मीटर रुंद, दोन्ही बाजूला प्रत्येकी १२ मीटर रुंद सर्व्हिस रस्ते

Web Title: Tender approved for earlier contractor