मेट्रो भुयारी मार्गाच्या निविदा दोन महिन्यांत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पुणे - शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान मेट्रो भुयारी मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर हे काम सुरू होईल. या मार्गावर स्थानकांना जागा मिळविण्यासाठी संबंधितांबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती मेट्रो कंपनीचे कार्यकारी संचालक प्रमोद अहुजा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या मार्गाचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. प्रत्यक्षात भुयारी मार्गासाठी मशिनरी कोणत्या वापराव्यात यासंदर्भात निविदेत नमूद केले आहे. भुयारी मार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी स्थानकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. फडके हौद चौक, मंडई या ठिकाणी स्थानक उभे करावे लागणार आहे. या ठिकाणी काही मिळकती बाधित होत असून, संबंधित मिळकतधारकांशी चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पीएमपी व महापालिका आदी शासकीय यंत्रणांशी चर्चा सुरू आहे. शिवाजीनगर येथे ट्रान्स्पोर्ट हब उभारण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाच्या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर तेथील बस वाहतूक कशी करता येईल याबाबतही विचार सुरू आहे. भुयारी मार्ग, स्थानक यांचे रचना, आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे अहुजा यांनी सांगितले. स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग भुयारी करण्यासंदर्भात आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी कळविली आहे.

Web Title: Tender for Metro subway in two months