नाशिक फाटा ते मोशी रस्त्याची नोव्हेंबरमध्ये निविदा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पिंपरी - नाशिक फाटा ते मोशीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत रस्त्याच्या कामाचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करणार असून, नोव्हेंबरमध्ये रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. 

यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या वेळी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, महामेट्रोचे गौतम बिऱ्हाडे उपस्थित होते. 

आढळराव म्हणाले,  ‘‘गेल्या काही महिन्यांपासून नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम रखडले आहे. नाशिक फाटा ते मोशी हा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिका हद्‌दीतून जात असल्याने भविष्यात या रस्त्यावर मेट्रोचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. याचा विचार करूनच रस्त्याच्या सविस्तर अहवालाला केंद्र सरकारची मंजुरी घेणे आवश्‍यक आहे.’’ 

महापालिकेकडे अहवाल
या रस्त्याच्या कामाला विलंब झाला आहे, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून यासंदर्भातील कार्यक्रम तयार करावा. येत्या २३ ऑगस्टपर्यंत या मार्गावरील मेट्रोचा मार्ग, संभाव्य स्थानकांच्या जागा निश्‍चित करून त्याचा अहवाल महापालिकेकडे सादर करावा, अशा सूचनाही खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या वेळी दिल्या.

Web Title: Tender in Nashik Phata to Moshi Road in November