esakal | पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुण्यात भाजप- शिवसेनेतील तणाव निवळला
sakal

बोलून बातमी शोधा

bjp shivsena

पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुण्यात भाजप- शिवसेनेतील तणाव निवळला

sakal_logo
By
मंगेश कोळपकर

पुणे - शहर पोलिसांनी योग्य वेळीच मन वळविल्यामुळे पुण्यातील भारतीय जनता पक्ष- शिवसेना कार्यकर्त्यांमधील तणाव निवळला. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत पार पडण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काढलेल्या उदगारांच्या पाश्वभूमीवर भाजप- शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सुमारे १५ दिवसांपूर्वी तणाव निर्माण झाला होता. त्या दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्ये केली होती. त्या बद्दल भाजपच्या लिगल सेलतर्फे डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी ‘राऊत यांना गणेशोत्सवात पुण्यात फिरून देणार नाही,’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गटनेते पृथ्वीराज सुतार, श्याम देशपांडे, विशाल धनवडे यांनी प्रतिआव्हान दिले होते.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीवर महाविद्यालयीन मित्राकडून लैंगिक अत्याचार

या पार्श्वभूमीवर राऊत यांचा गणेशोत्सवानंतर पुणे दौरा आहे. ही बाबत लक्षात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दोन्ही पक्षांमधील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. उत्सवाच्या काळात आव्हान- प्रतिआव्हान दिल्यास वातावरण चिघळेल, असे नमूद केले. तसेच उत्सवाला प्राधान्य देण्याचे आवाहन करीत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची मनधरणी केली. त्यानंतर दोन्ही बाजूने समंजसपणा दाखविण्यात आला. त्यामुळे राऊत यांच्या नियोजीत दौऱ्यादरम्यान होऊ शकणारा तणाव निवळला.

मात्र, खासदार राऊत २२ किंवा २३ सप्टेंबर रोजी पुण्यात येणार असून त्यावेळी त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा वडगाव शेरीमध्ये होणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. तर, पोलिसांच्या विनंतीला मान देऊन हा विषय ताणणार नसल्याचे भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. या बाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे ‘सकाळ’ने विचारणा केली असता, त्यांनी मौन बाळगले.

loading image
go to top