esakal | गच्चीत फुलवा सेंद्रिय भाजीपाला, फुलझाडे
sakal

बोलून बातमी शोधा

गच्चीत फुलवा सेंद्रिय भाजीपाला, फुलझाडे

गच्चीत फुलवा सेंद्रिय भाजीपाला, फुलझाडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: टाळेबंदीच्या काळातही ऑनलाइन भरभरून ऑनलाइन प्रतिसाद मिळालेली ‘टेरेस गार्डनिंग’ अर्थात ‘परसबाग’ ही कार्यशाळा आता खास वीकएन्डला ऑफलाइन घेण्यात येत असून, ४ व ५ सप्टेंबर रोजी ‘सिमॅसेस लर्निंग’ येथे आयोजित करण्यात आली आहे.

यात परसबागेतील कुंड्या कशा भराव्या, कोणती फुलझाडे, भाजीपाला लावावा, वाफे कसे तयार करावे, त्यात कोणती खते घालावीत, रोग-किडींचा प्रादुर्भाव झाल्यास काय उपाय करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

कार्यशाळेत इकेबाना या जपानी पुष्परचनेची पदवी घेतलेल्या तज्ज्ञ परसबाग नियोजन, कुंडीत भाजीपाला लागवडीचे व्यवस्थापन, पूर्वतयारी, सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन करतील. प्रतिव्यक्ती शुल्क तीन हजार पाचशे रुपये. यात चहा, नाश्‍ता, जेवण, प्रशिक्षण साहित्य आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

नावनोंदणीसाठी संपर्क : ९८८१०९९४२६.

कार्यशाळेचे ठिकाण : एसआयआयएलसी, सकाळनगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

बघा दोनशे कुंड्यांची परसबाग

शिवारफेरीत दोनशे कुंड्यांची उत्तम व्यवस्थापन असलेली परसबाग दाखविली जाणार आहे. तसेच, टेरेसवर वाफे तयार करून विविध फुलझाडे, सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याची केलेली लागवड बघता येईल.

loading image
go to top