leopard
sakal
पुणे
Leopard : गव्हाच्या शेतात बिबट्यांच्या झुंजीचा थरार; नारायणगावात पाटे-खैरे मळ्यातील घटना
गव्हाच्या शेतात दोन बिबट्यांमध्ये सुरू असलेल्या झुंजीने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
नारायणगाव - येथील पाटे–खैरे मळा शिवारात शुक्रवारी (ता. २६) सकाळी अकराच्या सुमारास गव्हाच्या शेतात दोन बिबट्यांमध्ये सुरू असलेल्या झुंजीने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. साधारणत: एक फूट वाढलेल्या गव्हाच्या पिकात अचानक सुरू झालेल्या या झुंजीमुळे शेतात काम करणारे मजूर भयभीत झाले होते.
