

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही विमान कंपन्यांनी गैरफायदा घेत तिकीट दरात वाढ केली आहे. श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी सात ते आठ हजारांचे दर होते. मात्र, हल्ल्यानंतर म्हणजे मंगळवारी ३२ ते ३६ हजारांवर गेले आहे. विमान कंपन्यांच्या नफेखोरीमुळे टुरिझम कंपन्या आणि पर्यटकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.