

Bomb found Hadapsar Hospital
esakal
पुणे - हडपसर परिसरातील रुग्णालयात बुधवारी सायंकाळी सापडलेली संशयास्पद वस्तू ही केवळ बॉम्बसदृश नसून ती प्रत्यक्षात इम्प्रुव्हाईज्ड एक्सप्लोसीव्ह डिव्हाईस (आयईडी) तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले स्फोटक उपकरण असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, रुग्णालयात घातपात घडविण्याचा डाव होता का? याचा तपास आता दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तसेच पुणे पोलिसांकडून सुरू केला आहे. हडपसर भागातील कामधेनू इस्टेटच्या मागील बाजून हे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात बुधवारी (ता.१३) सायंकाळी एका व्यक्तीला संशयास्पद वस्तू आढळून आली.