

TET Examination Security Tightened: New Dress Code Rules Announced
sakal
पुणे : तुम्ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणार असाल, तर इकडे लक्ष द्या. तुम्हाला टीईटी परीक्षेला दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी यापैकी काहीही घालता येणार नाही. याशिवाय परीक्षेला जाताना परीक्षार्थींनी आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्राची मूळ प्रत सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींसाठी या सूचना दिल्या आहेत.