

TET Paper Leak Investigation in Maharashtra
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा तपास कोल्हापूर पोलिसांमार्फत सुरू आहे. या तपासातील एक भाग म्हणून कोल्हापूर पोलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले. या पथकाने राज्य परीक्षा परिषदेच्या पुण्यातील मुख्य कार्यालयाला भेट दिली. राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक शिक्षकाला टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, केवळ पाच वर्षे सेवा शिल्लक राहिलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ परीक्षेतून वगळ्यात आले आहे.