esakal | 'सरकार पाडणे ही आमची संस्कृती नाही, पण...'; वाचा काय म्हणाले चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant_Patil

बिहार विधानसभा आणि इतर ठिकाणच्या पोट निवडणुकांच्या निकालांचा परिणाम राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवर स्वाभाविकपणे होणार आहे.

'सरकार पाडणे ही आमची संस्कृती नाही, पण...'; वाचा काय म्हणाले चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : "राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही, ती आमची संस्कृती नाही. मात्र महाविकास आघाडीचे सरकार हे चार वर्ष टिकणार नाही, त्याची कारणे गुलदस्त्यात आहेत, आताच हे उघड करता येणार नाही,' अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता.११) गुपित फोडण्यास नकार दिला. यापुढेही रडत न बसता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

अभिमानास्पद! पुणे विद्यापीठातील ८ शास्त्रज्ञांना स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचं मानांकन

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता.११) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, मुक्ता टिळक, भिमराव तापकीर, माजी आमदार मेधा कुलकर्णी आदींसह भाजपचे नेते उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, "मी पुणे पदवीधर मतदारसंघाचा आमदार असताना शासकीय निधीतून अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. पदवीधरांच्या मतदार यादीमध्ये असलेल्या अनेक चुका मी दुरुस्त करुन घेतल्या. त्यासाठी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पदवीधर आणि शिक्षकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी भाजपचे उमेदवार प्रयत्न करतील.' 

तीन महिन्यांपासून होमगार्ड जवान पगाराविना; आता दिवाळी तरी गोड होणार का?​

जैन मंदिर, मशिदी यांच्यासह सर्व मंदिरे खुली करावीत, अशी आमची प्रमुख मागणी आहे. जशी पोटाची भूक असते. तशी मनाची आणि बुद्धीची भूक भागविण्यासाठी ज्यांची श्रद्धा आहे. ते मंदिरात जाऊ शकतात, पण ज्याची श्रद्धा नाही. ज्यांना थोतंड वाटते. त्यांना मंदिरात जाणे बंधनकारक नाही. ज्यांना भक्ती करायची आहे. त्यांना का थांबवले जाते, असा टोलाही पाटील यांनी राज्य सरकारला लगाविला.

बिहारमधील विजयाबद्दल पाटील म्हणाले, बिहार विधानसभा आणि इतर ठिकाणच्या पोट निवडणुकांच्या निकालांचा परिणाम राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवर स्वाभाविकपणे होणार आहे. या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली असून त्याच जल्लोष पूर्ण वातावरणात ते उमेदवाराचा प्रचार करतील.

'मी अर्णब गोस्वामींचा चॅनेल पाहत नाही पण...'; काय म्हणाले न्यायमूर्ती चंद्रचूड?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)