भर उन्हातही ‘ठंडा ठंडा कूल कूल’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सुखसागरनगर येथील रहिवासी उमेश दारवटकर यांची नामी शक्‍कल

पुणे - शहरात काही दिवसांपूर्वी तापमानाने चाळिसी ओलांडली होती. अशाही वातावरणात घर ‘ठंडा ठंडा कूल कूल’ कसे ठेवावे याची नामी शक्‍कल सुखसागरनगर येथील रहिवासी उमेश दारवटकर यांनी शोधून काढली आहे.

गच्चीवरच्या मोकळ्या जागेत पोती आणि थर्माकोल अंथरून त्यावर पाण्याचा शिडकावा केला आणि बाजूच्या भिंतींना नारळ्याच्या फांद्या लावल्या आणि ऐन उन्हातही घर थंडगार राहण्याचा अनुभव घेतला.

या प्रयोगामुळे बाहेरच्या वातावरणापेक्षा घरातले तापमान पंधरा अंशांनी कमी होते. पंखे, कूलर, वातानुकूलित यंत्रणांनी घरातले तापमान नियंत्रण ठेवण्यास काही अंशी मदत होतेच; परंतु नैसर्गिक साधनांच्या वापरातूनही घर कसे थंड ठेवता येईल, हे दारवटकर यांनी प्रयोगातून सिद्ध केले आहे. दारवटकर यांचा सुखसागरनगर येथील सीमासागर सोसायटीत बंगला आहे. बंगल्याच्या गच्चीवरील भाग पोती आणि थर्माकोलने अच्छादित करून ते गारवा अनुभवत आहेत.

दारवटकर म्हणाले, ‘‘मी बंगल्याच्या बाजूने भिंतींना लागून नारळाच्या झाडाच्या फांद्या उभ्या केल्या आहेत. गच्चीवर सात फूट उंचीवर पाण्याचे पाइप बसविले असून त्याद्वारे पाण्याचा फवारा उडतो. पाण्याच्या शिडकाव्याने मन प्रसन्न होते, तसेच आजूबाजूचे तापमानही कमी होते.’’

असा अनुभवा नैसर्गिक गारवा

गच्चीवर पोती, थर्माकोल अंथरणे
त्यावर पाण्याचा शिडकावा करणे
भिंतींना नारळ्याच्या फांद्या लावणे

तापमान नियंत्रण ठेवण्यास मदत

Web Title: thand thanda cool cool

टॅग्स