esakal | लग्न मंडपात रक्तदानाचा अनोखा आहेर; नवरानवरीने केले रक्तदान

बोलून बातमी शोधा

donated blood
दौंड : लग्न मंडपात रक्तदानाचा अनोखा आहेर; नवरानवरीने केले रक्तदान
sakal_logo
By
रमेश वत्रे

केडगाव (जि. पुणे) ः कोरोनाचा कहरात रक्ताचा तुटवडा असल्याने देऊळगावगाडा (ता. दौंड) (Daund) येथे एका पैलवानाने स्वतःच्या लग्न मंडपात रक्तदान शिबिर (Donated Blood ठेवले. नवरदेवाच्या हाकेला तरूणांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. नवरा-नवरीने हळदीच्या अंगाने रक्तदान (Blood donation) करत वेगळा पायंडा पाडला आहे. लग्नात अक्षता म्हणून फुलांचा वापर करण्यात आला. (the couple donated blood in the wedding tent)

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला

देऊळगावगाडा येथील मारूती कोकरे यांचा मुलगा अंकुश व कुरबावी ( ता. माळशिरस ) येथील गोरख रूपनवर यांची मुलगी पुनम यांचा शुभविवाह आज कोकरे यांच्या घरापुढे साध्या पद्धतीने पार पडला. पैलवान व फार्मासिस्ट असलेल्या नवरदेवाने आपला विवाह सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा अशी इच्छा वडीलांपुढे मांडली. वडील मारूती कोकरे यांनी त्यास होकार दिला. पठ्ठ्याने लग्नाचे प्री वेडींगही पारंपरीक वेशभूषेत व आपल्या मेंढरांसमवेत केले.

हेही वाचा: पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई

लग्नाच्या दिवशी मंडपात आहेर मोडणे, हळद खेळणे, जेवणावळी, वाद्यांचा गजर, हार-तुरे, सत्कार- स्वागत समारंभ अशी नुसती रलचेल असते परंतू पैलवानांनी या सर्वांना फाटा दिला. लग्नाची साधी डिजिटल पत्रिकासुद्धा काढली नाही. मंडपात सकाळपासूनच रक्तदान शिबिर चालू होते. वर अंकुश व वधू पुनम यांनीही रक्तदान केले. अंकुश कोकरे म्हणाले, धनगर समाजात प्रथा बदलणे म्हणजे फार कठीण. पण माझ्या कुटुंबाने मला या कार्यात पुर्ण पाठिंबा दिला. रक्ताचा तुटवडा एेकल्याने रक्तदान शिबिर घेतले. अक्षतामुळे तांदुळ वाया जातो म्हणून व-हाडींना तांदुळा एेवजी फुल्यांच्या पाकळ्या दिल्या.

अक्षताचे तांदुळ दिले आश्रमशाळेला-अंकुश व पुनमच्या लग्नात अक्षता फक्त व्यासपीठावरील व-हाडींनाच देण्यात आल्या. इतर व-हाडींना फुलांच्या पाकळ्या देण्यात आल्या. यातून बचत झालेला तांदुळ सुपे ( ता.बारामती ) येथील प्राजक्ता गतिमंद मुलांच्या निवासी शाळेला व गलांडवाडी (ता. दौंड) येथील खाडे बालकाश्रमाला देण्यात आला. आंब्याच्या रोपांचे रोपण करून व-हाडी मंडळींना रोपे देण्यात आली. या उपक्रमामुळे कोकरे व रूपनवर कुटुंबियांचे कौतुक होत आहे.